पुणे -निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक भागात सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे आश्विनी महिला बचत गटाच्या रेशनिंग धान्य दुकानावरील छत उडाल्याने दुकानाचे नुकसान झाले आहे. दुकानामधील तांदुळ, गहू, डाळ अशी सर्व धान्य पावसात भिजल्याने हानी झाली आहे. खेड तालुक्यातील साकुर्डीमध्ये ही घटना घडली आहे.
वादळी वाऱ्यामुळे रेशनिंग दुकानाचे उडाले छत ; धान्य पावसात भिजल्याने आर्थिक नुकसान - cyclone nisarga pune News
वादळी वाऱ्यामुळे आश्विनी महिला बचत गटाच्या रेशनिंग धान्य दुकानावरील छत उडाल्याने दुकानाचे नुकसान झाले आहे. दुकानामधील तांदुळ, गहू, डाळ अशी सर्व धान्य पावसात भिजल्याने हानी झाली आहे. खेड तालुक्यातील साकुर्डीमध्ये ही घटना घडली आहे.
लॉकडाऊनच्या काळात रेशनिंगच्या माध्यमातून स्वस्त दरात धान्य वाटप करण्यात येत होते. या धान्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, निसर्ग चक्रीवादळात दुकानावरील छत उडाल्याने तीन टन तांदुळ, गहू पावसात भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे नागरिकाना संकटकाळात धान्य वाटपाला अडचण येणार आहे
कोरोनाच्या महामारीच्या संकटाचा सामना करत असताना निसर्ग चक्रीवादळाचे संकट समोर उभे राहिले आहे. या चक्रीवादळाचा फटका सर्वत्र बसलेला पहायला मिळत आहे.