महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवकाळी पावसामुळे मंचर बाजार समितीतील शेतमालाचे नुकसान - rain

सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील मंचर बाजार समितीमधील शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे मंचर बाजार समितीतील शेतमालाचे नुकसान

By

Published : Apr 15, 2019, 9:02 PM IST

पुणे - सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील मंचर बाजार समितीमधील शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही मोठ्या कसोशीने शेती पिकवणारा शेतकरी अडचणीत आला आहे.

अवकाळी पावसामुळे मंचर बाजार समितीतील शेतमालाचे नुकसान

गेल्या वर्षीपासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी हतबल झाला होता. अशा परिस्थितीतही शेतीत उत्पन्न घेण्यात शेतकरी यशस्वी झाला होता. मात्र, सध्या अवकाळी पावसाचे आगमन झाल्यानंतर काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तर काही प्रमाणात नुकसानही सहन करावे लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details