बारामती (पुणे) - महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा, हरियाणा राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत (मोकोका) कारवाई करण्यात आली आहे. बारामती तालुक्यातील मोरगाव ते निरा रस्त्यावर सुमारे 6 कोटी 62 लाख रुपये किमतीचे फिल्टर सिगारेट बॉक्स भरलेला ट्रक 24 जूनला 13 जणांनी दरोडा टाकून लुटला होता.
महाराष्ट्रासह परराज्यातही लूट करणारी टोळी जेरबंद; मकोकाअंतर्गत कारवाई - sdpo office baramati
महाराष्ट्र राज्यासह इतर अनेक राज्यांमध्ये लूट करणाऱ्या टोळीला बारामती पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही कारवाई बारामती पोलिसांनी केली.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, स.पो.नि. गुंड, पो.उ.नि. मोरे आणि पथकाच्या मदतीने वडगाव निंबाळकर पोलिसांनी कल्याणसिंग सदुलसिंग चौहान (वय-४४. रा. ओढ, ता. सोनकच, जि. देवास), ओमप्रकाश कृष्णा झाला (वय-३८, रा. भैरवखेडी, ता. टोकखुर्द, जि. देवास), दिनेश वासुदेव झाला (वय-५०, रा. टोककला, ता. टोंकखुर्द जि. देवास) तसेच सुशिल राजेंद्र झाला (वय-३७, रा. टोककला, ता. टोंकखुर्द, जि. देवास), गंगाराम राजाराम सिसोदिया (वय- ४२, रा. भैरवखेडी, ता. टोकखुर्द, जि.देवास), सतिश अंतरसिह झांझा (वय-४०, रा. ओढ, ता. सोनकच, जि. देवास) आणि मनोज केसरसिंग गुडेन ( वय-४०, रा. ओढ, ता. सोनकच, जि. देवास) यांना अटक केली. त्यांच्याकडून 3 कोटी 89 लाख, 34 हजार 792 हजारांचा माल, दोन ट्रक जप्त करण्यात आले आहेत.
या आरोपींविरोधात महाराष्ट्रात यवत, शिकापुर, शनि शिंगणापुर पोलीस ठाण्यातील हद्दीत गुन्हे दाखल आहेत. तसेच कर्नाटक उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिसा आणि हरियाणा राज्यांतही त्यांच्यावर औषधे असलेल्या ट्रकवर तसेच सिगारेटच्या ट्रकवर दरोडा टाकून त्यातील माल लुटून नेणे, यासारखे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईबाबत पुणे ग्रामीणचे प्रभारी पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते यांनी 15 हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे. आतापर्यत बारामती उपविभागात 16 टोळ्यांविरुद्ध मकोकाअंर्तगत कारवाई करण्यात आली आहे.