महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिरुरमध्ये गृहमंत्री अमित शहांचा रोड शो; पोलिसांच्या लॉंगमार्चमुळे छावणीचे स्वरूप - amit shah road show pune

पुणे जिल्ह्यातील शिरुर शहरातुन आज (रविवारी) भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री यांचा रोड शो पार पडला. यासाठी पोलीस दलाकडून लाँगमार्च काढण्यात आला. यावेळी संपूर्ण शिरुर शहराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.

शिरुरमध्ये पोलिसांच्या लॉंगमार्चमुळे छावणीचे स्वरूप

By

Published : Oct 13, 2019, 6:17 PM IST

पुणे - जिल्ह्यातील शिरुर शहरातुन आज (रविवारी) भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री यांचा रोड शो पार पडला. या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून लाँगमार्च काढण्यात आला. यावेळी संपूर्ण शिरुर शहराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.

शिरुरमध्ये पोलिसांच्या लॉंगमार्चमुळे छावणीचे स्वरूप

हेही वाचा -महिलांचे प्रश्न सोडविणाऱ्या सरकारच्या पाठिशी उभे रहा - चित्रा वाघ

सध्या सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशा परिस्थितीत राजकिय नेत्यांच्या सभा, पदयात्रा सुरू आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्‍त ठेऊन लाँगमार्च करण्यात आला आहे. तसेच शनिवारी सुरक्षेच्या मुद्यावरुन शिरुर शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांकडून काढण्यात आले होते. मात्र, रविवारी हा आदेश रद्द करण्यात आले, असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details