महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोणावळ्यात 165 तर मावळमध्ये 102 मिलिमीटर पावसाची नोंद - Lonavla received 165 mm of rainfall while Maval received 102 mm

लोणावळ्यात गेल्या 24 तासात तुफान पावसाची हजेरी लावली असून, तब्बल 165 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर मावळमध्ये 102 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

लोणावळ्यात 165 तर मावळमध्ये 102 मिलिमीटर पावसाची नोंद
लोणावळ्यात 165 तर मावळमध्ये 102 मिलिमीटर पावसाची नोंद

By

Published : Jun 20, 2021, 11:54 AM IST

पिंपरी-चिंचवड - पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळा आणि मावळ परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. लोणावळ्यात गेल्या 24 तासात तब्बल 165 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर मावळ परिसरात 102 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मावळ आणि लोणावळा परिसर हा पर्यटनासाठी विशेष ओळखला जातो.

लोणावळ्यात 165 तर मावळमध्ये 102 मिलिमीटर पावसाची नोंद

२४ तासात पाणीसाठ्यात 2.32% वाढ

पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरात पावसाने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जोरदार बॅटिंग केली आहे. लोणावळ्यात गेल्या 24 तासात तुफान पावसाची हजेरी लावली असून, तब्बल 165 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत या मोसमात 704 मिलिमीटर पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 445 मिलिमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली होती. तर, मावळमध्ये गेल्या 24 तासात 102 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, 1 जून पासून एकुण 345 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 223 मिलिमीटर पाऊस झाला होता. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात वाढ झाली असून, सध्याचा पाणीसाठा 31.92% वर पोहचला आहे. गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात 2.32% ने वाढ झाली आहे.

हेही वाचा -जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करा - पालकमंत्री अजित पवार

ABOUT THE AUTHOR

...view details