लोणावळा (पुणे) - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी पर्यटनस्थळी नियमांचे उल्लंघन करून येऊ नये, असे आवाहन केले होते. परंतु, त्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत आज भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी झाल्याचे निदर्शनास आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळी नागरिकांना बंदी आहे. परंतु, त्यांचे उल्लंघन करून शनिवार आणि रविवार विकेंडचा दिवस असल्याने पुणे जिल्ह्यातून लोणावळा परिसरात हजारो पर्यटक दाखल होतात. डॅमवर मोठ्या संख्येने पर्यटक पाहायला मिळाले असून त्यांनी भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून पाण्यात भिजण्याचा आनंद घेतला. लोणावळ्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. लोणावळा शहराचे आकर्षण असलेल्या भुशी धरणावर भिजण्यासाठी एकच झुंबड उडत आहे. लोणावळा शहर पोलिसांचा बंदोबस्त जागोजागी पाहायला मिळत असून पर्यटक पोलिसांची नजर चुकवून जात असल्याचे समोर आले आहे.
पुणे, मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे हौसी पर्यटक येतात. परंतु, त्यांनी कोविडचे नियम धुडकावून लोणावळा येथील पर्यटनस्थळी येऊ नये, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान, भुशी धरणावर आलेल्या पर्यटकांना पोलिसांनी हुसकावून लावले आहे.
दरम्यान, एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार पर्यटकांनी पर्यस्थळी गर्दी करू नका आणि शासनाच्या नियमांच पालन करावं असं आवाहन करत असताना, दुसरीकडे त्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत, नियम डावलून पर्यटक गर्दी करताना दिसत आहे.
नियम डावलून राज्यातील अनेक पर्यटनस्थळावर नागरिकांची गर्दी -