पुणे -लोणावळ्याच्या भुशी धरणावर अडकलेल्या तरुणांचा जीव वाचवण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. धरणाच्या पायऱ्यांवर बसून हे तरुण पाण्याच्या प्रवाहाचा आनंद घेत होते. तेवढ्यात अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि हे सर्व जण अडकले. यानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलीस प्रशासनाने त्यांना मदत करत सुखरूप बाहेर काढले.
लोणावळ्यातील भुशी धरण पर्यटनस्थळांपैकी एक आहे. येथे पावसाळ्यात हजारो पर्यटक दाखल होतात. अशातच शुक्रवारी काही हौशी तरुण मित्रांसह या धरणावर पाण्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. हे सर्व जण भुशी धरणाच्या पायऱ्यांजवळील पाण्यात उतरले. त्यावेळी पाण्याचा प्रवाह कमी होत. मात्र, पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने हे सर्व जण त्यात अडकले.