LIVE UPDATE -
- पार्थ नव्हे , तर अजित पवार यांचा पराभव - श्रीरंग बारणे
- पार्थ पवारांना पराभवाचा धक्का; बारणेंनी राखला मावळचा 'गड'
- 12.18 - पार्थ पवार 1 लाख 51 हजार मतांनी पिछाडीवर, बारणेंची जोरदार मुसंडी
- 11.50 - पार्थ पवार 1 लाख 35 हजार 302 मतांनी पिछाडीवर
- 11.30 - श्रीरंग बारणे - 354875, पार्थ पवार - 242241
- 11.10 - पार्थ पवार 91 हजार मतांनी पिछाडीवर
- 10.55 -बारणेंच्या आघाडीचा वेग वाढला, पार्थ पवार 81 हजार मतांनी पिछाडीवर
10.45 - श्रीरंग बारणे - 245043, पार्थ पवार - 170556 - 10.35 - श्रीरंग बारणे - 229821, पार्थ पवार - 161002
- 10.20 - श्रीरंग बारणे - 202363, पार्थ पवार - 145140
- 9.40 - श्रीरंग बारणे - 97,388 मते
- 9.40 पार्थ पवार - 74,770 मते
- 9.10 - श्रीरंग बारणे 9 हजार मतांनी आघाडीवर
- 9.00 - पार्थ पवार आघाडीवर
- 8.30 - पोस्टल मतमोजणीला सुरुवात
पुणे- मावळ लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या या बालेकिल्ल्यात पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, तरीही पार्थ पवार यांचा पराभव झाला आहे. या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा 2 लाखांच्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यामुळे हा पवार कुटुंबीयांना मोठा धक्का आहे.
लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नव्याने तयार झालेला मावळ लोकसभा मतदारसंघ २०१९ ला तिसऱ्या निवडणुकीला सामोरे गेला होता. पुणे जिल्ह्यातील ३ आणि रायगड जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघांना एकत्र करून नव्याने तयार झालेला हा मतदारसंघ आहे. राजकीय, ऐतिहासिक आणि भौगोलिक विविधतेचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ. आतापर्यंत झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये इथे शिवसेनेचा खासदार निवडून आल्याने तिसऱ्या वेळीही शिवसेनेचाच भगवा फडकला आहे. श्रीरंग बारणे यांनी हॅट्रिक मारत आपला गड राखला आहे.
मावळ मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून -