पुणे- आज राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यात पुणे मतदारसंघात लढत होत आहे. बापट यांचे सर्व राजकीय पक्षांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने भाजपसाठी ही जमेची बाजू असल्याचे म्हटले जात आहे.
Loksabha Election 2019: पुणे मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 43.63 टक्के मतदान
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात काँग्रेसपुढे अस्तित्वाचे आव्हान उभे असून राजकीय परिस्थिती भाजपला अनुकूल असल्याचे म्हटले जात आहे.
मोहन जोशी अन् बापटांनी बजावला मतदानाचा हक्क
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुण्यात काँग्रेसपुढे अस्तित्वाचे आव्हान उभे असून राजकीय परिस्थिती भाजपला अनुकूल असल्याचे म्हटले जात आहे.
- पुण्यात विविध राजकीय पक्षांचे नेते, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मतदान केले. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट, शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे, अभिनेता आणि दिग्दर्शक योगेश देशपांडे, अमोल पालेकर, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, आदींचा समावेश आहे.
- शिवाजी मराठा शाळेत झालेल्या प्रकारची चौकशी केली जात आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे - जिल्हाधिकारी
- 7.30: पुण्यात सुमारे 53 टक्के मतदान होण्याची शक्यता - जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती
- 7.30: 35 जणांनी मतदार यादीत नाव नसल्याची तक्रार केली आहे. त्यासंदर्भात सुधारणा करण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे - जिल्हाधिकारी
- 6.00: पुणे मतदार संघात 5 वाजेपर्यंत 43.63 टक्के मतदान
- 4.32: पुणे मतदारसंघात 4 वाजेपर्यंत 37.90 टक्के मतदान
- 3.56 : पुणे मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 36.29 टक्के मतदान
- 3.03 - माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पुणे येथे केले मतदान
- 1.53 - पुणे मतदारसंघात 1 वाजेपर्यंत 27.17 टक्के मतदान
- 12.20 - पुण्यात राजकीय नेते, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे मतदान. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट, नीलम गोऱ्हे, अभिनेता आणि दिग्दर्शक योगेश देशपांडे, अमोल पालेकर, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचा समावेश.
- 11.45 - पुणे मतदारसंघात 11 वाजेपर्यंत 15.50 टक्के मतदान
- 10.55 - शिवसेनेच्या निलम गोरेंनी आईसह पुण्यातील मॉडर्न कॉलनीतील विद्याभवन शाळेत केले मतदान
- 10.47 - पुण्यात नववधूने लग्नापूर्वी बजावला मतदानाचा हक्क. नातेवाईक आणि नागरिकांनाही केले मतदान करण्याचे आवाहन
- 9.47 - पुणे मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी शनिवार पेठेतील अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये सहकुटुंब केले मतदान. पुण्यातील चारही मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा व्यक्त केला विश्वास
- 9.42 - पुण्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.70 टक्के मतदान
- 9.37 - केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी पुण्यातील मयुर कॉलनी येथील मतदान केंद्रावर केले मतदान. भाजपच्या विजयाचा केला दावा.
- 8.43 - पुणे लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी पत्नी आणि कुटुंबियांसह बजावला मतदानाच हक्क. सॅलीसबरी पार्क येथील ह्युम मॅकहेंरी स्कुलमध्ये केले मतदान .
-
8.09 - पुण्यातल्या कोथरूडमधील भारतीय शिक्षण संस्था केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान पाऊण तास उशीराने सुरू
- 7.35 - पुणे मतदारसंघात मतदानाला सुरूवात
Last Updated : Apr 23, 2019, 10:36 PM IST