महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'यांना' कोरोनाच्या संसर्गाची भिती नाही का..? राजगुरुनगमधील सजग नागरिकांचा सवाल - rajgurunagar corona update

राजगुरुनगर शहरात लॉकडाऊन कडक करण्यासाठी पोलीस, महसुल विभाग, नगरपरिषद दिवसरात्र काम करत असून, सामाजिक संस्था मोलाचे योगदान देत आहेत. सर्व सुविधा उपलब्ध असतानाही नागरिक बिनधास्तपणे शहरात फिरू लागले आहेत.

lockdown rules
'यांना' कोरोनाच्या संसर्गाची भिती नाही का..? राजगुरुनगमधील सजग नागरिकांचा सवाल

By

Published : Apr 8, 2020, 5:42 PM IST

राजगुरुनगर (पुणे) - कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी राजगुरुनगर शहरात लॉकडाऊन कडक करत, भाजीपाला किराणा, अत्यावश्यक सेवा घरपोच सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, आता नागरिक लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत असल्याचे चित्र दिसत आहे. मोठ्या संख्येने लोक शहरात फिरताना दिसत आहेत यांना कोरोनाच्या संसर्गाची भिती राहिली नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

'यांना' कोरोनाच्या संसर्गाची भिती नाही का..? राजगुरुनगमधील सजग नागरिकांचा सवाल

राजगुरुनगर शहरात लॉकडाऊन कडक करण्यासाठी पोलीस, महसुल विभाग, नगरपरिषद दिवसरात्र काम करत असून, सामाजिक संस्था मोलाचे योगदान देत आहेत. सर्व सुविधा उपलब्ध असतानाही नागरिक बिनधास्तपणे शहरात फिरू लागले आहेत. त्यामुळे कोरोनाचा समुह संसर्ग होण्याची भिती निर्माण झाली आहे. किराणा, भाजीपाला, दुध आणि इतर अत्यावश्यक सेवा घरपोच देण्यासाठी व्यापारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतलेला आहे.

'यांना' कोरोनाच्या संसर्गाची भिती नाही का..? राजगुरुनगमधील सजग नागरिकांचा सवाल

7 दिवसांनंतर नागरिकांनी बाहेर पडून भाजीपाला खरेदीसाठी शहरातील विविध भागात गर्दी करायला सुरुवात केली आहे. शहरातील प्रमुख रस्ते बंद करण्यात आले असतानाही नागरिक पर्यायी जागा शोधत बाहेर पडत असून शासकिय नियम पायदळी तुडवत आहेत. त्यामुळे पुढील काळात कोरोनाचा समुह संसर्ग वाढण्याची भिती शहरातील नागरिक व्यक्त करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details