पुणे - हाताला काम नको..खायाला अन्न नको.. पण आम्हाला आमच्या गावाला जाऊ द्या, अशी आर्त हाक कामगारांनी दिली आहे. हे कामगार आपल्या गावी जाण्यासाठी पुणे-नगर महामार्गावरून भर उन्हातून पायी प्रवास करत निघाले आहेत.
हाताला काम नको.. खायला अन्न नको.. पण आम्हाला आमच्या गावाला जाऊ द्या.. - कामगारांचा भर उन्हातून पायी प्रवास
गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेक कामगार अडकले आहेत. राज्य सरकारने काही नियम व अटीवर या कामगारांना सोडण्याचे धोरण राबविले जात आहे. मात्र, शासकीय पातळीवर वेळकाढूपणा सुरू असल्याचे सांगत हे कामगार आता भर उन्हातून पायीच निघाले आहेत.
सध्या उन्हाने चाळिशीचा पारा गाठला असून सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. तर, जमिनीतून अंगाला चटके बसत असताना भर उन्हातून औद्योगिक क्षेत्रात अडकलेले कामगार परतीच्या प्रवासाला लागले आहे.
गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेक कामगार अडकले आहेत. या कामगारांना आता आपल्या घरची ओढ लागली आहे. राज्य सरकारने काही नियम व अटीवर या कामगारांना सोडण्याचे धोरण राबविले जात आहे. आरोग्य तपासणी करून कामगारांच्या जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र, शासकीय पातळीवर वेळकाढूपणा सुरू असल्याचे सांगत हे कामगार आता भर उन्हातून पायीच निघाले आहेत. पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर, सणसवाडी परिसरातून पायी प्रवास करत ते आपल्या गावी जाऊ लागले आहेत.