पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. याचा परिणाम आता उद्योग व्यवसायांवर होऊ लागला आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण व रांजणगाव औद्योगीक वसाहतीमधील मोठ्या उद्योगांसह लघुउद्योग संकटात सापडले आहेत. त्यामुळे पुढील काळात या उद्योगांना उभारी देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी उद्योजक करत आहेत.
कोरोना: चाकण, रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील लघुउद्योग संकटात... - Ranjangaon and chakan MIDC in pune
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 3 मेपर्यंत देशात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. याचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण व रांजणगाव औद्योगीक वसाहतीमधील मोठ्या उद्योगांसह लघुउद्योग संकटात सापडले आहेत.
पुणे जिल्ह्यातील चाकण व रांजणगाव औद्योगिक वसाहत कमी दिवसांत चांगल्या नावारुपाला आली आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत छोट्या-मोठ्या अशा २५० पेक्षा जास्त कंपन्या आहेत. तर चाकण औद्योगिक वसाहतीत ३५० पर्यंत छोटे मोठे उद्योग आहेत. यामध्ये जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्या या औद्योगिक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहेत. मात्र, नोटबंदी, जीसीटीनंतर या उद्योगनगरीत मंदीचे मोठं सावट उभं राहिले आहे. या संकटातूनही मार्ग काढत लघुउद्योगांनी उभारी घेतली आहे. मात्र, सध्या लॉकडाऊनचे मोठं संकट या उद्योगांसमोर उभे राहीले आहे.