महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीत लॉकडाऊनला सुरुवात, शहरातील रस्ते निर्मनुष्य

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी बारामती शहरात आजपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. आजपासून पुढील आठ दिवसांपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

बारामतीत लॉकडाऊनला सुरुवात
बारामतीत लॉकडाऊनला सुरुवात

By

Published : Jul 16, 2020, 5:24 PM IST

पुणे -कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने बारामती शहरात आज (गुरुवार)पासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले असून ते २३ जुलैपर्यंत कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर बारामती नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून शहराच्या चौबाजूच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आज सकाळपासूनच शहरात शुकशुकाट असून सर्व रस्ते निर्मनुष्य असल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी बारामती शहरात आजपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. आजपासून पुढील आठ दिवसांपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान, मास्क न वापरणे, विनाकारण रस्त्यावर फिरणे, गर्दी करून थांबणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. याकामी नगरपालिका प्रशासन पोलिसांना मदत करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details