महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'साहेबांचं कार्य लई मोठ्ठं.. साऱ्या महाराष्ट्राच्या मनातला रणझुंजार नेता' - locals met ncp president sharad pawar at govind baug his residence in baramati

शरद पवार साहेबांनी आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी खूप काही केले आहे. त्यांचे महाराष्ट्रात आणि देशात एवढे मोठे काम आहे की, त्यांची प्रतिमा आमच्या मनात रणझुंजार नेता म्हणून आहे..

गोविंद बागेत शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

By

Published : Oct 28, 2019, 1:06 PM IST

Updated : Oct 28, 2019, 3:15 PM IST

बारामती -शरद पवार आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब दिवाळी पाडव्याच्या दिवशी बारामती येथील गोविंद बागेत जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी येत असतात, तसेच वर्षातून एकदा त्यांना भेटण्यासाठी येतात. गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीयांकडून ही परंपरा सुरू आहे. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या 91 वर्षीय पंडितराव दरेकर यांनी त्यांच्या भावना ईटीव्ही भारतला सांगितल्या आहेत.

गोविंद बागेत शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

पवारांना भेटल्यावर अगदी देवाला भेटल्यासारखे वाटते

शरद पवार साहेबांनी आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी खूप काही केले आहे. त्यांचे महाराष्ट्रात आणि देशात एवढे मोठे काम आहे की, यामुळे त्यांची प्रतिमा आमच्या मनात रणझुंजार नेता म्हणून आहे. गेली पन्नास वर्ष मी पवार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येतो आहे. पवार साहेबांना भेटल्यानंतर मनाला समाधान वाटते. अगदी देवाला भेटल्यासारखे वाटते, अशी भावना 91 वर्षाचे पंडितराव मारुती दरेकर यांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा... शरद पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बागेत कार्यकर्त्यांची मांदियाळी

महाराष्ट्रात राजकीय शरद पवार आणि कुटुंबीयांकडून आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी पाडव्याच्या दिवशी शरद पवार यांच्यासह संपूर्ण कुटुंबीय बारामती येथील गोविंद बागेत जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी येतात. गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबियांकडून ही परंपरा सुरू आहे. अगदी तीन वर्षांच्या चिमुकलीसह महिला-पुरुष आणि वयोवृद्ध या निमित्ताने पवार कुटुंबियांना भेटायला येतात. यावर्षी देखील राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेते, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पवार कुटुंबातील शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार आणि इतर सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा... रामराजे निंबाळकर यांनी गोविंद बागेत घेतली शरद पवारांची भेट

अखेर अजित पवार दिसले....

विधानसभा निवडणूक निकालानंतर प्रथमच अजित पवार गोविंद बागेत सर्वांच्या दृष्टीस आले. विधानसभा निवडणूकीच्या निकालापासुन अजित पवार हे माध्यमांसमोर आले नाहित. मात्र सोमवारी दिवाळी पाडवा निमित्त नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी व नागरिकांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी अजित पवार गोविंद बागेत आले होते.

Last Updated : Oct 28, 2019, 3:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details