महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Marathi Sahitya Sammelan: मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी 'या' साहित्यिकाची निवड - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी, ज्येष्ठ समीक्षक यांची नावे चर्चेत होती.

Marathi Sahitya Sammelan
रवींद्र शोभणे

By

Published : Jun 25, 2023, 4:22 PM IST

पुणे:९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी, ज्येष्ठ समीक्षक यांची नावे चर्चेत होती.

'या' तारखेला होणार संमेलन:अखेर शोभणे यांची बहुमताने निवड करण्यात आली. याच बैठकीत संमेलनाच्या तारखांवरही विचार झाला असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संमेलनाचे आयोजन होण्याची शक्यता आहे.

पालक मेळावा आयोजित:आज झालेल्या बैठकीबाबत अध्यक्षा उषा तांबे म्हणाल्या की, यंदाच 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अमळनेर येथे 2,3 आणि 4 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या संमेलनासाठी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड एकमताने करण्यात आली आहे. संमेलनात साने गुरुजींच्या अस्तित्वाचं तसेच व्यक्तिमत्वाचं महत्त्व लक्षात घेत पालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तसेच संमेलनाच्या पद्धतीने सर्व कार्यक्रम होणार असल्याचे यावेळी तांबे यांनी सांगितले.


या पुरस्काराचे मानकरी:डॉ. शोभणे हे कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक आहेत. शोभणे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये 'उत्तरायण'साठी महाराष्ट्र फाऊंडेशन(अमेरिका)चा पुरस्कार, मारवाडी प्रतिष्ठानचा घनश्यामदास सराफ पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा पु. ल. देशपांडे कादंबरी पुरस्कार, सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव येथे आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.

साहित्य संमेलनातून समाज प्रबोधन: वर्ध्यात फेब्रुवारी, 2023 मध्ये पार पडलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एक कवी, समाज सुधारकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण या कवीने केवळ आपल्या कवितेतून समाज प्रबोधनाचा वसा घेतला नाही तर, तो गाडगे महाराजांच्या रुपात जोपासला देखील आहे. फुलचंद नागटिळक असे या कवीचे नाव आहे. ते व्यवसायाने शेतकरी असून गेली 25 वर्षे गाडगे महाराजांच्या वेषात समाजप्रबोधन करीत आहेत.

गाडगेबाबांचा संदेश: फुलचंद नागटिळक हे असे अवलिया आहेत की ज्यांनी ३० साहित्य संमेलन पाहिले आहेत. काही वेळेला पायी चालत जाऊन, सायकलने जाऊन, माल वाहतूक ट्रक तर कधी विमानात जाऊनही त्यांनी साहित्य संमेलनाला हजेरी लावली आहे. नागटिळक यांना फक्त साहित्य संमेलनाची आवड आहे असे नाही. ते कीर्तन करतात. नटसम्राट या नाटकाचा एकपात्री प्रयोगही फुलचंद पार पडतात. आत्तापर्यंत नटसम्राटचे हजारो एकपात्री प्रयोग नागटिळक यांनी सादर केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details