महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Husband Murder Case : पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नीला जन्मठेप

पती-पत्नीमध्ये पटत नसल्याने त्यांच्यात सतत भांडणे होत होती. याच कारणावरून शोभा हिने पतीच्या डोक्यात दगड घातला तसेच विळ्याने वार करत पतीचा खून (Husband stoned to death) केला होता. खटल्यात शोभा अनिल इंगळे हिला येथील जिल्हा न्यायाधीश जे. ए. शेख यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा (Life imprisonment for wife) सुनावली.

Husband Murder Case
Husband Murder Case

By

Published : Dec 6, 2022, 8:48 PM IST

बारामती (पुणे) : पतीचा दगडाने ठेचून, विळ्याने वार करुन खून (Husband stoned to death) केल्याच्या खटल्यात शोभा अनिल इंगळे (रा. साळोबावस्ती, खुटबाव, ता. दौंड) हिला येथील जिल्हा न्यायाधीश जे. ए. शेख यांनी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा (Life imprisonment for wife) सुनावली. (Latest news from Baramati) अनिल संतोष इंगळे यांचा या घटनेत खून झाला (Baramati crime) होता.


पतीच्या डोक्यात दगड घातला; अन्... :दौंड तालुक्यातील खुटबाव येथे २३ ऑगस्ट २०१५ रोजी ही घटना घडली होती. अनिल संतोष इंगळे व शोभा अनिल इंगळे या पती-पत्नीमध्ये पटत नसल्याने त्यांच्यात सतत भांडणे होत होती. याच कारणावरून शोभा हिने पतीच्या डोक्यात दगड घातला तसेच विळ्याने वार करत पतीचा खून केला होता. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात मयताचे भाऊ सुनील संतोष इंगळे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार शोभा हिच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस अधिकारी आर. के. गवळी यांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपी महिलेविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.


न्यायालयाने सुनावलेली शिक्षा :या खटल्यात सरकार पक्षाकडून दहा साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सरकारी वकील सुनील वसेकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने भादंवि कलम ३०२ नुसार जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा शोभा इंगळे हिला सुनावली. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी मदने यांनी काम पाहिले. पोलीस नाईक वेणूनाद ढोपरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एन. ए. नलवडे यांचे सहकार्य केले.

ABOUT THE AUTHOR

...view details