पुणे- औद्योगिक क्षेत्रामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक त्या सगळ्या उपायोजना केल्या जातील, अशी ग्वाही कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पुण्यातील कंपन्यांच्या मनुष्यबळ व्यवस्थापकांना दिली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंटच्या (एनआयपीएम) पुणे विभागाच्या वतीने मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सभागृहात बाळा भेगडे आणि मनुष्य व्यवस्थापकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
औद्योगिक क्षेत्रामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपाययोजना करू, बाळा भेगडेंचे आश्वासन - मनुष्यबळ
देशाच्या एकूण औद्योगिक विकासामध्ये पुण्याचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत असल्याचे बाळा भेगडे यांनी सांगितले.
औद्योगिक क्षेत्रांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपाययोजना करू, बाळा भेगडेंचे आश्वासन
यावेळी भेगडे म्हणाले की, देशाच्या एकूण औद्योगिक विकासामध्ये पुण्याचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.
त्याप्रमाणेच मनुष्यबळ आणि विविध कायद्यांमधील तरतुदीं संदर्भात कंपन्यांच्या वतीने काही महत्वाचे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. या प्रश्नासंदर्भात सरकार सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन देखील बाळा भेगडे यांनी कंपन्यांना दिले.