पुणे -नाशिक विधान परिषद निवडणुकीत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत भाजपने अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही. तर, काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला.सत्यजित तांबे आणि त्यांच्या वडिलांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
योग्य वेळी योग्य निर्णय - काँग्रेस तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचं जगजाहीर आहे. आता भाजपची भूमिका काय आहे, याकडे सर्वांचं लक्ष आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारल असता ते म्हणाले की आमचं धोरण हे काल आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल आहे. योग्य वेळी योग्य निर्णय आम्ही करू.सत्यजित तांबे यांचं एक युवा नेता म्हणून काम खूप चांगल आहे. परंतु राजकीय निर्णय योग्य वेळी आणि धोरणात्मक पद्धतीने करावे लागतात.आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे याबाबत निर्णय घेतील अस, यावेळी फडणवीस म्हणाले. पुण्यात एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
योग्यवेळी सगळं समोर येईल -यावेळी फडणवीस यांना तुम्ही हे गणित घडून आणल आहे.अशी चर्चा आहे, अस विचारलं असता ते म्हणाले की, आम्ही कोणतंही गणित घडवलेले नाही. मी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला गेलो होतो. पण सगळेच नेते तिथं होते. त्यामुळं हा घटनाक्रम चुकीच्या पद्धतीने जोडू नये. योग्यवेळी सगळं समोर येईल असे फडणवीस म्हणाले. तसेच आम्ही कोणता उमेदवार द्यायची यावर चर्चा सुरू होती. राजेंद्र विखेंनी उमेदवारी घ्यावी अशी चर्चा होती. पण ऐनवेळी उमेदवारी द्यायची नाही असं ठरवण्यात आले आहे.