पुणे - जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी मध्यरात्री बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे शिवनेरीवर जाणाऱ्या मावळ्यांमध्ये दहशत पसरली आहे. हा बिबट्या मध्यरात्री किल्ल्याच्या पायथ्याशी रस्त्यावर फिरताना दिसून आला आहे.
Leopard At Shivneri Fort : शिवनेरीवर जाणाऱ्या मावळ्यांसाठी धोक्याची घंटा: पायथ्याशी आढळून आला बिबट्या, परिसरात दहशत - शिवनेरीवर बिबट्याचे दर्शन
सर्वात जास्त बिबटे हे जुन्नर तालुक्यात पाहायला मिळतात. त्यामुळेच जुन्नर तालुका हा बिबट्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तसेच बिबट्या निवारण केंद्र देखील माणिकडोह येथे आहे. जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी मध्यरात्री बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे शिवनेरीवर जाणाऱ्या मावळ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

बिबट्यांचा तालुका म्हणून जुन्नरची ओळख -सर्वात जास्त बिबटे हे जुन्नर तालुक्यात पाहायला मिळतात. त्यामुळेच जुन्नर तालुका हा बिबट्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तसेच बिबट्या निवारण केंद्र देखील माणिकडोह येथे आहे. सर्वात जास्त बिबट्याचे हल्लेही जुन्नर तालुक्यात होतात. त्यातच बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शिवाय रात्रीच्या वेळी उशिरा बाहेर पडणे देखील अवघड झाले आहे.
परिसरातील गावात दहशत -बिबट्याने हल्ला केल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत. यातील काही घटना सीसीटीव्हीमध्ये कैदही झाल्या आहेत. त्यातच किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी बिबट्याचे दर्शन झाल्याने पुन्हा एकदा परिसरातील गावात दहशत पसरण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.