जुन्नर (पुणे) - जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. शुक्रवारी पहाटे बिबट्याने बेल्हे व नळावणे परिसरात हल्ला करत 30 कोंबड्या व एका शेळीचा फडशा पाडला. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतीला पाणी देत असताना दिवसा विजेचा लपंडाव सुरु असून त्यामुळे शेतक-यांना रात्रीच्या वेळी शेतीला पाणी द्यायला बाहेर पडावे लागत आहे. अशात बिबट्याची दहशत वाढल्याने शेतक-यांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून शेतात पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.