पिंपरी-चिंचवड - चाकण MIDC मधील मर्सिडीज कंपनीत बिबट्या शिरल्याची घटना (Leopard in Chakan MIDC) आज पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर म्हाळुंगे पोलीस आणि चाकण वनविभाग यांना बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे. कंपनीच्या बॉडी शॉप सेक्शनमधील कामगारांना खबरदारी म्हणून बाहेर काढण्यात आले होते.
Leopard in Chakan MIDC : सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर चाकणमधील मर्सिडीज कंपनीतील बिबट्या जेरबंद - चाकण एमआयडीसी बिबट्या सुटका
चाकण MIDC मधील मर्सिडीज कंपनीत बिबट्या शिरल्याची घटना (Leopard in Chakan MIDC) आज पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर म्हाळुंगे पोलीस आणि चाकण वनविभाग यांना बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे.
बिबट्यावर बेशुद्ध इंजेक्शनचा मारा करून पकडले -
मिळालेल्या माहितीनुसार, चाकणमधील मर्सिडीज कंपनीत पहाटेच्या सुमारास बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच म्हाळुंगे पोलीस, चाकण, जुन्नर वनविभाग हे बिबट्याला पकडण्यासाठी कंपनीत दाखल झाले होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कंपनीबाहेर बघ्यांची गर्दी जमा झाली होती. सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलीस आणि वनविभागाला बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. बिबट्यावर बेशुद्ध इंजेक्शनचा मारा करून पकडण्यात आले, अशी माहिती तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.