पुणे -भक्ष्याच्या मागे धावत असताना 8 वर्षीय बिबट्याची मादी मंगळवारी पहाटेच्या सुमारास आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे विहिरीत पडल्याची घटना घडली होती. स्थानिक नागरिक, वनविभाग आणि माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राच्या बचाव पथकाच्या मदतीने या मादी बिबट्याला विहिरीतून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.
भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला जीवदान
आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे 8 वर्षीय बिबट्याची मादी विहीरीत पडली. भक्ष्याच्या मागे धावताना ही मादी बिबट्या विहीरीत पडली.
हेही वाचा -माळेगाव सहकारी साखर कारखाना पुन्हा पवारांच्या ताब्यात
नागापूर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याच्या मादीचा बछड्यांसह वावर असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. या परिसरात या बिबट्या मादीने पाळीव कुत्र्यांवरही हल्ले केले आहेत. मंगळवारी पहाटेच्या सुमारास भक्ष्यामागे धावत असताना शेताजवळील कठडे नसलेल्या विहिरीत ही बिबट्याची मादी पडली. कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज झाल्यामुळे ही घटना उघडकीस आली. उसाच्या शेतांमध्ये बिबट्यांचे वास्तव्य वाढल्यामुळे पाळीव प्राण्यांवर हल्ल्याचे प्रमाणही वाढले आहे. वेळीच बिबट्याच्या संगोपनाबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.