राजगुरुनगर (पुणे) -सध्या ऊस तोडणी सुरू असल्याने बिबट्याच्या माणसांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून रात्रीच्या सुमारास राजगुरुनगर जवळील तिन्हेवाडी तर आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ला चढविला. यामध्ये चांडोली येथील दोन व्यक्ती जखमी, तर तिन्हेवाडी येथील दुचाकीस्वार थोडक्यात बचावल्याची घटना घडली. बिबट्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
बिबट्याची दहशत
पुण्याच्या ग्रामीण भागात दोन ठिकाणी बिबट्याचा दुचाकीस्वारांवर हल्ला
निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे जंगल भाग कमी होत चालला आहे. यामुळे बिबट्यासारखे वन्य प्राणी नाईलाजास्तव पुण्याच्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यातील परिसरात ऊस शेतीचा आसरा घेताना आढळतात. सध्या ऊसाची तोडणी सुरू असल्याने बिबटे ऊसातून बाहेर पडत लोकवस्तीतील येऊ लागले आहेत.
निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे जंगल भाग कमी होत चालला आहे. यामुळे बिबट्यासारखे वन्य प्राणी नाईलाजास्तव पुण्याच्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यातील परिसरात ऊस शेतीचा आसरा घेताना आढळतात. सध्या ऊसाची तोडणी सुरू असल्याने बिबटे ऊसातून बाहेर पडत लोकवस्तीतील येऊ लागले आहेत. बिबटे पाळीव प्राण्यांसह माणसांवर हल्ला करू लागले आहेत. पुण्याच्या ग्रामीण भागात बिबट्याची दहशत नागरिकांमध्ये पसरली आहे.
शेती पंपाच्या वीजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी शेतकरी रात्रीचा बाहेर पडत आहे. याच अंधाराचा फायदा घेऊन दबा धरून बिबटे माणसांवर हल्ला करत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शेतकरी वर्गात भीती निर्माण झाली आहे. वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
(सूचना - बातमीतील बिबट्याचा फोटो प्रतिकात्मक आहे)