पुणे - येथील शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे बिबट्याने घरात घुसून ७० वर्षीय वृद्ध महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. वृद्ध महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिराबाई बबन खळदकर, असे हल्ला झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
पुण्यात बिबट्याचा घरात घुसून वृद्ध महिलेवर हल्ला; महिला गंभीर जखमी - पुण्यात बिबट्याचा घरात घुसून वृद्ध महिलेवर हल्ला बातमी
दुपारच्या सुमारास शिरुर तालुक्यातील इनामगाव गावात हिराबाई या वृद्ध महिला घरात एकट्याच होत्या. घराच्या बाजुला असणाऱ्या उसातून शिकारीच्या शोधात बिबट बाहेर पडला आणि थेट घरात घुसला. यावेळी बिबट्याने वृद्ध महिलेवर हल्ला केला.
हेही वाचा-रिलायन्स कंपनीच्या संचालकपदावरून अनिल अंबानी स्वत: पायउतार
गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांचे माणसांवरील हल्ले वाढत आहेत. आता बिबट्याने भर दुपारच्या सुमारात घरात घुसून हल्ला केल्याने परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने वेळीच बिबट्याच्या या हल्ल्यांवर प्रतिबंध आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
आज दुपारच्या सुमारास शिरुर तालुक्यातील इनामगाव गावात हिराबाई या वृद्ध महिला घरात एकट्याच होत्या. घराच्या बाजुला असणाऱ्या उसातून शिकारीच्या शोधात बिबट बाहेर पडला आणि थेट घरात घुसला. यावेळी बिबट्याने वृद्ध महिलेवर हल्ला केला. यात महिलेने आरडाओरडा केल्याने आजुबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली. त्यावेळी बिबट्याने धुम ठोकली. मात्र, महिलेच्या हाताला, छातीवर बिबट्याने मोठ्या जखमा केल्या आहेत.