आंबेगाव (पुणे) -आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथे पहाटेच्या सुमारास घराच्या दरवाज्यात बसलेल्या पाळीव श्वानाला बिबट्याने हल्ला करत भक्ष्य केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
बिबट्याचा पाळीव श्वानावर हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद - पुणे जिल्हा बातमी
आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथे पहाटेच्या सुमारास एका बिबट्याने श्वानावर हल्ला करत भक्ष्य केले आहे.
आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील काळूराम लोखंडे यांच्या रहात्या घराच्या दरवाज्यात बसलेल्या श्वानावर पहाटेच्या सुमारास अचानक बिबट्याने हल्ला करत श्वानाला बिबट्याने ठार केल्याची घटना घडली असून शिंगवे येथे एका महिन्यात तिसरे श्वान बिबट्याने ठार केले आहे.
वळती ते शिंगवे रस्त्यावर काळूराम लोखंडे हे शेतकरी राहतात. सभोवताली ऊसाचे क्षेत्र आहे. त्यांना यापूर्वी अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे त्यांनी घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा श्वानावरील हल्ला कैद झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी काळूराम लोखंडे यांनी केली.
हेही वाचा -गृहमंत्र्यांनी 'त्या' पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावीत; अन्यथा.., प्रकाश आंबेडकरांचा इशारा