महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Leopard Attack On Baby : सात महिन्याच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला; आईने बिबट्याशी केले दोन हात... - बिबट्याचा छोट्या मुलावर हल्ला

Leopard Attack On Baby: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे फुटाणे मळा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. (Leopard Attack) आज (बुधवारी) पहाटेच्या सुमारास बिबट्याने एका सात महिन्यांच्या चिमुकल्यावर हल्ला केला. मात्र, मुलाच्या आईने पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी बिबट्याशी दोन हात करत त्याच्या तोंडातून मुलाला बाहेर ओढून त्याचे प्राण वाचवले आहे. (latest news from Pune) या महिलेच्या धाडसाचं कौतुक होत आहे. (latest news from Junner)

Leopard Attack On Baby
बिबट्याचा चिमुकल्यावर हल्ला

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 9:28 PM IST

चिमुकल्या बाळाची आई बिबट्याच्या हल्ल्याचा घटनाक्रम सांगताना

जुन्नर (पुणे) Leopard Attack On Baby:आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे फुटाणे मळा येथे सुखदेव फुटाणे यांच्या शेतात धोंडी करगळ यांचा मेंढपाळचा वाडा बसलेला होता. त्यांची पत्नी सोनल करगळ ही तिच्या सात महिन्यांचा मुलगा देवा याला घेऊन वाड्याच्या शेजारीच बाहेर झोपली होती. त्याच वेळी बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलाचा हात तोंडात धरत ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोनल करगळ यांना जाग आली. बिबट्या मुलाला ओढत असताना सोनल यांनी बघितले. त्यावेळी तिने एका हाताने मुलाला ओढत बिबट्याचा प्रतिकार सुरू केला. तिने एका हाताने बिबट्याचे तोंड दाबण्याचा प्रयत्न करत दुसऱ्या हाताने मुलाला वाचवण्यासाठी धडपड सुरू केली. त्यावेळी तिच्या कुटुंबातील सदस्य बाहेर येत त्यांनी जोर जोरात आरडाओरडा केला. त्यावेळी बिबट्या पळून गेला.

बिबट्याच्या हल्ल्याच्या जखमा :या हल्ल्यात सात महिन्यांचा मुलगा देवा धोंडीभाऊ करगळ याच्या हाताला दात लागला असून पोटाला नख्या लागल्या आहेत. घटनेची माहिती कळताच स्थानिक शेतकरी सागर विश्वासराव, प्रकाश फुटाणे यांनी मेंढपाळ कुटुंबाला धीर देत मुलाला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. सध्या मुलावर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मंचर येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान पहाटे घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतीच दोन दिवसांपूर्वीच जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहानग्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आंबेगाव तालुक्यात घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक शेतकरी करत आहेत.


बिबट्याचे हल्ले वाढले :जुन्नर आणि आंबेगाव परिसरात बिबट्टयांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. अनेक वर्षांपासून बिबट्याचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असून अनेकांवर बिबट्याने हल्ले देखील केल्याच्या घटना घडल्या आहेत; मात्र वनविभागाकडून बिबट्याला जेरबंद करून पुन्हा जुन्नर आणि आंबेगाव मधील जंगलात सोडून दिले जात असल्यामुळे बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. त्याचबरोबर दिवसा-ढवळ्या बिबट्या गाव वस्तीत शिरत असल्याचं चित्र आहे.

हेही वाचा:

  1. Leopard Attack On Youth: दोन बिबट्यांचा मुक्त संचार, शेतात काम करणाऱ्या तरुणावर बिबट्याचा हल्ला
  2. Leopard Attack in Nashik: पायी चालणाऱ्या व्यक्तीवर पाठीमागून बिबट्याचा अचानक हल्ला, पहा थरारक व्हिडिओ
  3. leopard Attacked : बिबट्याने केला तीन जणांवर हल्ला; पहा थरारक व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details