पुणे - 'मुंबईची यांनी तुंबई केली, शिवसेनेने करून दाखवलं' अशी उपरोधिक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. वरवरची कामे करतात, त्यामुळे मूळ मुद्द्यांकडे हे लक्ष देत नाहीत. पावसाळा गेल्यानंतरही 7 ते 8 महिने रस्त्यांवर खड्डे राहतात. 30 ते 40 वर्षे सत्ता उपभोगून शिवसेनेने काय केले? असा प्रश्न दरेकर यांनी केला. ते आज पुण्यात बोलत होते.
अभिनेत्री कंगना ही 'ड्रगिस्ट' असेल तर तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशीच आमची भूमिका असल्याचे देखील दरेकर यावेळी म्हणाले. राज्यातील कोविड परिस्थिती हाताळण्यात या सरकारला अपयश आले आहे. सर्व आघड्यांवर हे सरकार 'फेल' ठरल्याची टीका त्यांनी केली. राज्यातील विविध समस्या सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. सरकार कारखान्यांना, शेतकऱ्यांना मदत करते, तशीच ऊसतोड कामगारांनाही मदत केली पाहिजे. याबाबत काम झाले नाही तर विरोधीपक्ष नेते म्हणून आपण त्याचा जाब विचारू, असे दरेकर म्हणाले.
हेही वाचा -पुणे जिल्ह्याला अंमली पदार्थाचा विळखा, आठ महिन्यात तब्बल 1300 किलो गांजा जप्त