पुणे -कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी राज्यातील सरकारी आणि महानगरपालिकेची रुग्णालये अहोरात्र काम करत आहेत. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी विधानपरिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने स्थानिक आमदार विकास कार्यक्रम २०२०-२१ निधीतून पैसे देण्याचा निर्णय डॉ. गोऱ्हे यांनी घेतला.
विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेंनी दिला पुणे महानगरपालिकेला २० लाखांचा निधी
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी विधानपरिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने स्थानिक आमदार विकास कार्यक्रम २०२०-२१ निधीतून पैसे देण्याचा निर्णय डॉ. गोऱ्हे यांनी घेतला.
डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये साहित्य खरेदीसाठी २० लाख रुपयांचा निधी डॉ. गोऱ्हे यांनी दिला. या निधीचा उपयोग पीपीई युनिटसाठी दहा लाख, इन्फ्रारेड थर्मामीटरसाठी दोन लाख, वैद्यकीय फेस मास्क, ग्लोव्हज् व सॅनिटायझरसाठी चार लाख, कोरोना टेस्टिंग किटसाठी चार लाख असा केला जाणार आहे.