पुणे :राज्यातीलसत्ता संघर्षाचा निकाल हा 12 तारखेला येण्याची शक्यता आहे. त्याच वेळेस सरकारमधील काही आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे एक न्यायाधीश निवृत्त होत असल्याने मी हे ट्विट केल्याची प्रतिक्रिया कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी दिली आहे. असीम सरोदे यांनी 12 तारखेला सरकार बदलेल असे एक ट्विट केले होते. त्यामुळे राज्यात एकच चर्चा सुरू होती.
महाविकास आघाडीची सत्ता :यावर बोलताना असीम सरोदे म्हणाले, की राज्यातील सत्ता संघर्षाच्या केसमध्ये ज्या शक्यता आहे. त्यामध्ये शेड्युल दहा प्रमाणे काही लोक आपत्र होणार आहेत. त्यामुळे कदाचित दुसऱ्या काही राजकीय समीकरणे तयार करून सरकार स्थापन होईल. महाविकास आघाडीची सुद्धा सत्ता येईल, अशी शक्यता आहे. तीच शक्यता एकूण सगळ्या सुनावणीमध्ये पुढे येत आहे. म्हणून असे शक्यता वर्तवली आहे. त्याला फार काही राजकीय संदर्भ नाहीत, असे सुद्धा असीम सरोदे म्हणाले आहेत.
राज्यात नवीन सत्ता समीकरणे :न्यायालयात राज्यातील सत्ता संघर्ष चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला राजीनामा वृत असेल किंवा गेल्या काही दिवसापासून अजित पवार हे भाजपासोबत जाणार अशी चर्चा आहे. ज्या ठामपणे ते मी मुख्यमंत्री होणार असे सांगत आहेत. त्या सगळ्या गोष्टी पाहता काहीतरी राजकीय समीकरणे होण्याची शक्याता आहे. असे माझे प्रमाणीक मत असल्याचे सरोदे म्हणाले. त्याचीच सगळी जुळवणी आहे. ती येत्या 7 तारखेपर्यंत राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होणार यांची चर्चा आहे. त्यानंतर 10 ते 11तारखेपर्यंत निकालानंतर राज्यात नवीन सत्ता समीकरणे किंवा नवीन सरकार येईल.
12 तारखेला निकाल येण्याची शक्याता : राज्यातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीमध्ये साधारणपणे 12 तारखेला निकाल येणार आहे. या निकालामध्ये अध्यक्षांना जास्तीत जास्त एक महिन्याचा अवधी दिला जाईल. त्यामध्ये त्यांना निर्णय घ्यावा लागेल. कायद्यातील स्पष्ट तरतुदीनुसार कलम 10 नुसार काही आमदारावर अपात्रतेची कारवाई होणारच आहे. संविधानात तशा तरतूद असल्यामुळे या सगळ्या न्यायाधीशांमध्ये एक न्यायाधीश 15 तारखेला निवृत होणार असल्यामुळे निकालावर सगळ्याच न्यायाधीशांची सही असल्याशिवाय निकाल देता येत नाही, म्हणून मी हे ट्विट केले आहे या सगळ्या अभ्यास करून केलेल्या शक्यता असल्याचे असीम सरोदे म्हणाले आहेत.
हेही वाचा - Uddhav Thackeray Criticizes BJP : महाराष्ट्राची राख, गुजरातमध्ये रांगोळी करायची आहे का?, उद्धव ठाकरे भाजपवर बरसले