पुणे: प्रजासत्ताक दिन तसेच ध्वजारोहण समारंभ पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस ग्राउंड वर संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पाटील यांना कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकी बाबत विचारले असता ते म्हणाले की नावांची शॉर्ट लिस्ट तयार करण्यात आली आहे. ती केंद्रात पाठविण्यात येणार आहे. तेव्हा केंद्रीय नेतृत्व 30 किंवा 1 तारखेला बसून निर्णय घेईल.आणि तेव्हाच नावं डिकलेर करण्यात येईल असे यावेळी पाटील म्हणाले.
मातोश्रीवर जायचे आदेश नाही:ठाकरेंचे दार हे तुमच्यासाठी ही बंद आहे का अस पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की राज्यातील राजकारणातील मी इतका खालचा नेता आहे. 2014 साली मी 30 वेळा मातोश्रीवर गेलो त्यानंतर सत्ता असताना देखील मातोश्रीवर गेलो. मातोश्रीवर जायचे माझ्या पक्षाने अजून आदेश दिलेले नाही. म्हणून मी देखील टेस्टिंग केलेले नाही की मातोश्री माझ्यासाठी बंद आहे की खुली आहे.
कोयता गँगवर मोक्का: कोयता गँग बाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की आत्ता जे सापडत आहे ते भुरटे सापडत आहे. इझी मनीसाठी लागलेली ही सवय आहे. लोकांना आवाहन आहे की त्यांनी अश्या पद्धतीने कोणीही आल् की पैसे देऊ नये. कोयता गँगवर मोक्का लावण्याचे सूचना मी पोलीस आयुक्तांना दिले आहे.जो पर्यंत 50 ते 60 लोकांवर कारवाई होत नाही तो पर्यंत कळणार नसल्याचे यावेळी पाटील म्हणाले.
जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य : विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचा २३ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेला शपतविधी सोहळा आजही चर्चेचा विषय आहे. दोघांनी देखील पहाटेचं राज्यपालांकडे हजेरी लावली होती. या शपतविधीने पुढे बराच काळ राज्याच्या राजकारणात गोंधळ सुरू होता. या सर्व घटनेवर आत जयंत पाटलांनी एक खळबळजनक वक्तव्य केले होते. पहाटेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र हा शपथविधी पवारांची एक खेळू असू शकते असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. तसेच सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा : Jayant Patil on Shivsena VBA Alliance शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही जयंत पाटील