महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन चोरट्यांना 13 मोटारसायकींसह अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई - पुणे जिल्हा बातमी

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 9 गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपी व मुद्देमालासह पोलीस पथक
आरोपी व मुद्देमालासह पोलीस पथक

By

Published : Dec 17, 2020, 10:33 PM IST

जुन्नर (पुणे) -पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांकडून 13 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून आळेफाटा व नारायणगाव परिसरातील 6 तर नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील 3, असे एकूण 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. सचिन दिघे व ऋषीकेश दरेकर, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सापळ रचून घेतल ताब्यात

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोटारसायकल चोरीच्या घटना वारंवार घडत आहे. या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांसमोर मोठे आव्हन होते. दरोडा, जबरी चोरी व मोटार सायकल चोरी सारखे गंभीर गुन्हे घडत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एक व्यक्ती चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी पारगावहून आळे येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. यावरून पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांचे पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन 9 गुन्हे उघडकीस आले असून 13 मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details