पुणे - ऑगस्टच्या नऊ तारखेपर्यंत सन्मानपूर्वक बोलणी केली नाही, तर उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी दिला आहे. आघाडी आणि डावे पक्ष लक्ष्मण माने यांच्या महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीला प्रतिसाद देत नसल्याने माने यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जागा वाटपाचे काय करणार? लवकर सांगा, आघाडी आणि डाव्या पक्षांना लक्ष्मण मानेंचा अल्टिमेटम - Aaghadi
लक्ष्मण माने हे स्वतः पुण्यातून विधानसभा लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुढे बोलताना माने म्हणाले, की आम्ही डाव्या पक्षांबरोबर जाण्याची आणि आघाडीबरोबर चर्चेची भूमिका घेतली. मात्र, काँग्रेस राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आमचे राज्यात 12 ते 13 टक्के मतदान आहे. तर आमची 70 जागांची मागणी आहे. मात्र, या जागा काही प्रमाणात कमी होतील, पण आमचा विचार केला नाही तर प्राबल्य असलेल्या 70 जागा लढवण्याचा इशारा माने यांनी दिला आहे. तर माने स्वतः पुण्यातून विधानसभा लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.