पुणे - वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेले लक्ष्मण माने यांनी आता नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. लक्ष्मण माने यांनी 'महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी' स्थापन करत विधानसभा लढवण्याची तयारी केली आहे. त्याबरोबरच आंबेडकरी संघटना आणि पक्ष आमच्या सोबत येणार आहेत, असेही माने यांनी सांगितले. त्यांचा हा पक्ष डाव्या आघाडीबरोबर जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
लक्ष्मण मानेंनी मांडली वेगळी चुल, नव्या राजकीय पक्षाची घोषणा - आरोप
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि डाव्या विचारांच्या पक्षासोबत चर्चा करणार करणार असून लोकसभा निवडणुकीमधील चूक आता करायची नाही, असे माने यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, भाजप, शिवसेनेला हरवण्यासाठी हा नवा पक्ष असून वंचित बहुजन आघाडीमुळे भाजप युतीचा लोकसभेत मोठा फायदा झाला आहे. त्याबरोबरच वंचित आघाडी भाजपसाठीच काम करत असल्याचा आरोप करत माने यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि डाव्या विचारांशी चर्चा करणार करणार असून लोकसभा निवडणुकीमधील चूक आता करायची नाही, असे माने यांनी सांगितले.
आम्ही जातीयवादी आणि धार्मिक संघटनाबरोबर जाणार नाही. किरकोळ स्वार्थासाठी बाबासाहेबांचा विचार सोडणार नाही, असे माने म्हणाले. माने यांच्या या नव्या पक्षात माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील देखील सहभागी आहेत.