पुणे - कार्यालयातच गळफास घेऊन एका वकिलाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. युवराज ननावरे असे वकिलाचे नाव आहे. ननावरे हे शिवाजीनगर न्यायालयात वकिली करत होते. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कार्यालायतच गळफास घेऊन वकिलाची आत्महत्या, पुण्यातली घटना
ननावरे मागील अनेक वर्षांपासून शिवाजीनगर न्यायालयात सिव्हील प्रॅक्टीस करत होते.
मृत युवराज ननावरे
ननावरे मागील अनेक वर्षांपासून शिवाजीनगर न्यायालयात सिव्हील प्रॅक्टीस करत होते. पुण्यातील धनकवडी परिसरात ते वास्तव्यास होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. ननावरे यांचा जनसंपर्क मोठा होता. त्यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या मित्र वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.