महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात 5 हजार 647 नवीन रुग्णांची नोंद, तर एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही - pune corona news

सध्या शहरातील सर्वच भागात मायक्रो कँटेमेंट झोन तयार करण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने ठिकठिकाणी सोसायट्या आणि अपार्टमेंटमध्ये मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. शहरात सरकार, महानगरपालिका आणि खासगी असे एकूण 100 रुग्णालये उपलब्ध आहे. या सर्व रुग्णालयात एकुण 20 हजार 25 इतके बेड्स उपलब्ध आहेत. त्यातील 3 हजार 606 बेड शिल्लक आहेत.

pune corona
pune corona

By

Published : Apr 11, 2021, 4:16 PM IST

पुणे - शहरात मागील 24 तासात 5 हजार 647 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 587 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनाबाधित 51 रुग्णांचा मृत्यू झाला. शहरात सक्रीय रुग्णांची संख्या 49 हजार 955 इतकी झाली आहे. दिवसभरात 27 हजार 986 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे.

सध्या शहरातील सर्वच भागात मायक्रो कन्टेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने ठिकठिकाणी सोसायट्या आणि अपार्टमेंटमध्ये मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. शहरात सरकार, महानगरपालिका आणि खासगी असे एकूण 100 रुग्णालये उपलब्ध आहे. या सर्व रुग्णालयात एकुण 20 हजार 25 इतके बेड्स उपलब्ध आहेत. त्यातील 3 हजार 606 बेड शिल्लक आहेत.

व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही

शहरात 1 हजार 25 आईसीयू व्हेंटिलेटर बेड आहेत. मात्र सध्या एकही बेड शिल्लक नाही. तसेच ऑक्सीजन बेड ची स्थिती पहिली तर एकूण 8 हजार 739 बेड उपलब्ध आहेत, त्यातील सध्या 871 बेड रिकामे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details