पुणे -भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज सकाळी निधन ( Lata Mangeshkar passes away ) झालं आहे. वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. लता दिदींनी आपल्या बालपणी काही काळ पुण्यातील एका वाड्यात वास्तव्य केले होते. 1940 ते 1942 या दोन वर्षे त्या तिथे राहिल्या होत्या. आज त्यांच्या आठवणीमध्ये ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींना या वाड्याचा आढावा घेतला.
Lata Mangeshkar passes away : पुण्यातील या वाड्यासोबत होते लतादीदींचे खास नाते... - लता मंगेशकर
गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या ( Lata Mangeshkar passes away ) निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. लता दीदींनी आपल्या बालपणी काही काळ पुण्यातील एका वाड्यात वास्तव्य केले होते. 1940 ते 1942 या दोन वर्षे त्या तिथे राहिल्या होत्या. आज त्यांच्या आठवणीमध्ये ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींना या वाड्याचा आढावा घेतला.

लता
या वाड्यात गेले लता दिदींचे बालपण
पुण्यातील शुक्रवार पेठ येथील वाड्यात संगीतरत्न दीनानाथ मंगेशकर हे सण 1940 ते 1942 या दोन वर्षे येथे राहत होते. त्यांच्यासोबत भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर या देखील राहत होत्या.
या वाड्यासोबत लता दीदींच्या काही खास आठवणी आहेत. या वाड्यात त्या गाणे गुणगुणत असे येथील रहिवाशी सुभाष दत्तात्रय रेळेकर यांनी सांगितलं. यावेळी दीदींच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
Last Updated : Feb 6, 2022, 8:06 PM IST