बारामती - पुणे- सोलापूर महामार्गांवर ( Pune Solapur Highway ) सरडेवाडी टोल नाक्यावर अवैद्य गुटखा वाहतूक ( Gutkha Transportation ) करणाऱ्या ट्रकवर इंदापूर पोलिसांनी काल रात्री शनिवार दि.16 रोजी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 93 लाख 23 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री उशिरा इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोल नाक्याजवळ ( Sardewadi Toll Gate ) नाकाबंदी दरम्यान सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने जाणारा ट्रक (के.ए 28 बी 9831) संशयास्पद वाटल्याने थांबवून चौकशी करण्यात आली. चौकशीत बंदी घालण्यात आलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असणारा 167 गोण्या गुटखा ( Got Gutkha ) मिळून आला. पोलिसांनी 68 लाख 23 हजार 920 रुपये किमतीचा गुटखा व 25 लाख रुपये किमतीचा गुटखा वाहतूक करणारा ट्रक असा एकूण 93 लाख 23 हजार 920 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी श्रीशैल तमाराय हलके,(वय 27 वर्ष रा.उमदी ता.जत,जि.सांगली ) व या ट्रकचालक विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Action Against Illegal Gutkha : इंदापूर पोलिसांची अवैध गुटख्यावर कारवाई; 93 लाख 23 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त.
इंदापूर पोलिसांनी काल रात्री पुणे- सोलापूर महामार्गांवर ( Pune Solapur Highway ) सरडेवाडी टोल नाक्यावर अवैद्य गुटखा वाहतूक ( Gutkha Transportation ) करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 93 लाख 23 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
इंदापूर पोलिसांकडून सहा महिन्यात सात मोठ्या कारवाया -इंदापूर पोलिसांकडून मागील सहा महिन्यात अवैद्य धंद्यांवर 7 मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुमारे 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरील गुटख्यावरील कारवाई ही पुणे ग्रामीण ( Pune Rural Police ) जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर यांनी सांगितले.
यांनी केली कारवाई....सदरील कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे,पोलिस हवालदार काशिनाथ नागराळे,पोलीस नाईक मोहम्मद अली मड्डी, बापू मोहिते,जगदीश चौधर,सुनील नगरे, मनोज गायकवाड,महेंद्र पवार,दिनेश चोरमले, लक्ष्मण सूर्यवंशी,सुनील बालगुडे,वैभव मदने, महेश गोसावी आदींनी केली आहे.