पुणे : महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या रॅलीत स्थानिक पदाधिकारी हे उपस्थित होते. यावेळी उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले की, कसबा पेठ निवडणुकीची लोकांना आपल्या हातात घेतली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, यंदा कसब्यात परिवर्तन होणारे यांनी कसब्यातील जनता हे मला येत्या 26 तारखेला मतदान करून विजयी करणार आहे. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानंतर सातत्याने कसबा पोट निवडणुकीत वेगवेगळे घटना पाहायला मिळाल्या. सूरवातीला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीबाबत झालेले नाराजी नाट्य, त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये झालेले बंड हे देखील कसबा पोटनिडणुकीत बघायला मिळाले.
सर्वच नेते कसब्यात :कसबा पोटनिवडणुकीत सुरवातीपासूनच प्रचारात स्थानिक मुद्दे बाजूला आणि राज्य तसेच देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा प्रामुख्याने बघायला मिळाली. भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, स्थानिक खासदार गिरीश बापट तसेच सर्वच नेतेमंडळी प्रचारात पाहायला मिळाले. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात देखील माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री तसेच महाविकास आघाडीतील सर्वच नेते मंडळी यांचे प्रचारात सक्रिय सहभाग पाहायला मिळाले. या सर्व नेते मंडळींकडून प्रचारात कसबा मतदार संघातील स्थानिक मुद्दे कमी तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप तसेच राज्य आणि देशातील मुद्दे प्रमुखाने मांडण्यात आले.