महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जुन्नर तालुक्यात जमिनीला पडल्या भेगा, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

जुन्नर तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या डोंगर परिसरातील भिवाडे बुद्रुक गावातील जमिनीला भेगा पडत आहेत. प्रशासनाने या गोष्टींकडे गांभीर्याने पाहून उपाययोजना करण्याची करावी, अन्यथा पुन्हा माळीण सारखी दुसरी घटना घडेल, अशी भिती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

junner
जमिनीला भेगा पडल्याने घराचे झालेले नुकसान

By

Published : Aug 25, 2020, 5:08 PM IST

Updated : Aug 25, 2020, 5:34 PM IST

जुन्नर (पुणे) -तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या डोंगर परिसरातील भिवाडे बुद्रुक गावातील जमिनीला भेगा पडून घर, रस्ता, जनावरांचा गोठा, विहिरी, विजेचे खांब पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच घटनेचा पंचनामा करुन जिल्हाधिकाऱ्यांकडे पंचनाम्याचा अहवाल पाठविला आहे.

जमिनीला पडलेल्या भेगा
जुन्नर तालुक्यातील भिवाडे बुद्रुक येथे राहणारे शिवाजी विरणक या आदिवासी शेतकऱ्याचे घर डोंगराच्या खुशीत व नदीपात्रापासून काहीच अंतरावर आहे. या परिसरात ठिकठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहे. तर आज (25 ऑगस्ट) सकाळपासून भेगा पडण्याचे प्रमाण वाढले. सकाळी अचानक वितणक यांच्या घराला तडे जाऊन घराच्या भिंती पडल्या. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेने विरणक यांचा संसार ऐन पावसात उघड्यावर आला आहे. जमिनीला पडलेल्या भेगा पाहून गावकऱ्यांमद्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सह्याद्रीच्या परिसरात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे जमीन ओली व भुसभुसीत होत आहे. यामुळे जमिनीला भेगा पडू लागल्याने नागरिकांची भिती अधिकच वाढली आहे. मागील दोन दिवसांत भेगा पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाने या गोष्टींकडे गांभीर्याने पाहून उपाययोजना करण्याची करावी, अन्यथा पुन्हा माळीण सारखी दुसरी घटना घडेल, अशी भिती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
Last Updated : Aug 25, 2020, 5:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details