महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावसामुळे ताम्हिणी-कोलाड रस्त्यावर दरड कोसळली; वाहतूक ठप्प

कोकणात जोरदार पाऊस पडत असून निवे गावालगत असलेल्या ताम्हिणी-कोलाड रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली आहे.

ताम्हिणी-कोलाड

By

Published : Sep 4, 2019, 10:45 AM IST

Updated : Sep 4, 2019, 10:53 AM IST

पुणे -कोकणात जोरदार पाऊस पडत असून निवे गावालगत असलेल्या ताम्हिणी-कोलाड रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली आहे. त्यामुळे पुणे-कोलाड सस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. गेल्या महिन्यात याच घाटामध्ये दरड कोसळ्यामुळे दोन दिवस वाहतूक ठप्प होती.


दरड रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे पुणे-कोलाडला जोडणाऱ्या घाटात अनेक वाहने अडकली आहेत. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त घरी गेलेल्या चाकरमान्यांची पावसामुळे तारांबळ उडाली आहे.

हे ही वाचा -मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, गणेशोत्सव काळातही सुरू असलेल्या शाळांना सुट्टी

गेल्या काही वर्षांमध्ये ताम्हिणी घाट रस्त्यामार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या या भागातील रस्त्याची रुंदी कमी-अधिक स्वरूपाची आहे. परिसरात जोराचा पाऊस आणि धुके आहे. रस्ता निसरडा झाला असून वाहन चुकीच्या बाजूने गेल्यास मोठा अपघात होऊ शकतो.

हे ही वाचा -हजारो बोटी जयगड बंदरात आश्रयाला; मुसळधार पावसाने वादळसदृश्य परिस्थिती​​​​​​​

गणेशोत्सवाच्या आगमनाबरोबर परतलेला पाऊस राज्यभर कोसळत आहे. मंगळवारी मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्याला झोडपणाऱ्या पावसाने रात्रीपासून पश्चिम महाराष्ट्र, कोकण व विदर्भात बरसत आहे. गडचिरोलीत १०० गावांचा संपर्क तुटला आहे. तर, कोकण व पुण्यात धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Last Updated : Sep 4, 2019, 10:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details