पर्यटक न आल्याने लोणावळ्यात व्यवसायिकांचे मोठे नुकसान - lonavala cororna news
यावर्षी कोरोना आणि नाईट कर्फ्युमुळे पर्यटक न आल्याने लोणावळ्यातील स्थानिक आणि किरकोळ व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना आणि नाईट कर्फ्युमुळे पर्यटनस्थळी शुकशुकाट होता.
![पर्यटक न आल्याने लोणावळ्यात व्यवसायिकांचे मोठे नुकसान lanavala loss of local business](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10079898-586-10079898-1609488760473.jpg)
लोणावळा (पुणे) - दरवर्षी लोणावळ्यात वर्षाअखेर पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. मात्र, यावर्षी कोरोना आणि नाईट कर्फ्युमुळे पर्यटक न आल्याने स्थानिक आणि किरकोळ व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना आणि नाईट कर्फ्युमुळे पर्यटनस्थळी शुकशुकाट होता. याचा फटका स्थानिक किरकोळ व्यापाऱ्यांना बसला आहे. याबाबत स्थानिक किरकोळ व्यापारी भीमा शिंगाडे यांनी माहिती दिली आहे.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात व्यवसाय
दरवर्षी लोणावळा शहर आणि पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असते. त्यामुळे स्थानिक किरकोळ व्यवसायिकांना मोठा फायदा व्हायचा. पावसाळा आणि नाताळ ते नवीन वर्ष या दरम्यान जास्त पर्यटक येत असतात. यावर्षी कोरोना आणि नाईट कर्फ्युमुळे पर्यटकांनी लोणावळ्याकडे पाठ फिरवली आहे. त्यात आठ महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प होता. पावसाळ्यातील सिझन गेले, मात्र प्रशासनाने पर्यटनस्थळावरील बंदी उठवल्याने किमान नाताळ आणि नवीन वर्षादरम्यान काही तरी व्यवसाय होण्याची शक्यता होती. मात्र महानगरासह लोणावळ्यात नाईट कर्फ्यु लागू करण्यात आला.