पुणे: पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून ड्रग्स तस्कर ललित पाटील पसार झाल्यानंतर पुणे पोलीस आणि मुंबई पोलीस दोघांकडून मोठी कारवाई करण्यात आली. ललित पाटील पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पुणे पोलिसांनीसुद्धा एक मोठी कारवाई केली. बुधवारी रात्री पोलिसांनी नाशिक शहरातून दोघींनी अटक केली. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशीं आरोपींची नावे आहेत. आज दुपारी पुण्यातील न्यायालयामध्ये दोन्ही महिलांना हजर करण्यात येणार आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अटकेतील दोन्ही महिलाललित पाटीलच्या मैत्रिणी असल्याचं बोललं जात आहे. या महिलांकडून अधिक तपासात काय समोर येतं, हे पाहणं महत्वाचं आहे. परंतु एकाच वेळी मुंबई पोलीस आणि पुणे पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात आरोपींना एकमेकांकडे तपासासाठी सुपूर्द करण्याच्या प्रक्रिया होणार आहेत. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर दोन्ही महिला ललित पाटीलच्या संपर्कात होत्या. त्याला पळून जाण्यासाठी दोघींनी मदत केल्याचा संशय आहे. ड्रग्सच्या काळ्या कमाईतून मिळवलेला पैसा ललित पाटीलनं या दोघींकडे ठेवल्याची माहिती समोर येत आहे.
पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर उपस्थित झाले होते प्रश्नचिन्ह-मला पळून लावण्यात आलं आहे. ससूनमधून मी पळालो नाही, असा दावा ललित पाटील यानं केला होता. त्यानंतर ललित पाटीलच्या प्रकरणात कोणाचा हातभार आहे, याचाही शोध लावला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बुधवारी दिली. कुणालाही सोडणार नाही, असं सांगत त्यांनी विरोधकांना इशारा दिला. पुणे पोलिसाच्या अगोदर मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला अटक केल्यानं पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यानंतर पुणे पोलिसांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात वेगानं कारवाई करण्यास सुरुवात केली.
ललित पाटीलच्या अटकेचे काय आहे प्रकरण?दोन आठवड्यांपूर्वी पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग डॉन ललित पाटील याला मुंबई पोलिसांच्या पथकाने बंगळुरू येथून अटक केली. त्याला अंधेरी न्यायालयानं बुधवारी 23 ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मुंबई पोलिसांनी यापूर्वी नाशिकमधील ललित पाटीलच्या अवैध अमली पदार्थ उत्पादन युनिटचा पर्दाफाश केला होता. तर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ऑक्टोबर 2020 मध्ये त्याचे कोट्यवधी रुपयांचे एमडी (मेफेड्रोन) रॅकेट उद्ध्वस्त केले होते. तेव्हापासून ललित पाटील जूनपर्यंत अटकेत होता. जूनमध्ये त्याला टीबी आणि हर्नियाच्या उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ललित पाटील यानं ससूनमधून पलायन केले. त्यावरून राज्यातील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
हेही वाचा-
- Shambhuraj Desai On Sushma Andhare : ललित पाटील प्रकरणी सुषमा अंधारेंनी वक्तव्य मागं घ्यावं, अन्यथा...- शंभूराज देसाई
- Lalit Patil Case Exclusive : छोटा राजनच्या साथीदारांच्या ललित पाटील कसा आला संपर्कात? वाचा सविस्तर...