महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : महिला सरपंचाने घेतला 'दुर्गा' अवतार... दारू विक्रेत्याची केली धुलाई

शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला या गावात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू होता. यामुळे शांत गावात सतत भांडणे होत होती. अवैध दारू विक्रीबाबत सतत पोलिसांकडे तक्रारी केल्यानंतर पोलीस तात्पुरती कारावाई करत होते. यामुळे महिला सरपंचानेच हातात दंडुका घेत दारू विक्रेत्याला महाप्रसाद दिला.

चोप देताना सरपंच
चोप देताना सरपंच

By

Published : Jun 20, 2020, 8:08 AM IST

शिरुर (पुणे) - गाव व गावातील अनेकांचे संसार गुण्या-गोविंदाने सुरू असताना शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला गावात अवैध दारुविक्री सुरू झाली आणि गावातील अनेकांच्या सुखी संसारात भांडणतंटे सुरू झाले. याबाबत पिंपरी दुमाला गावच्या सरपंच मनीषा खेडकर यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पण, पोलीस लक्ष देत नसल्याने अखेर सरपंच महिलेनेचे हातात दंडुका घेऊन दारू विक्रेत्याला चोप देत चांगलाच समाचार घेतला. यानंतर सर्वत्र दबंग महिला सरपंच मनीषा खेडकर यांचीच चर्चा सुरू झाली आहे.

चोप दिल्यानंतर माहिती देताना सरपंच
शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला परिसरामध्ये अनेक दिवसांपासून गावातील काही लोकांच्या राजकीय वरदहस्तामुळे अवैध दारुविक्री सुरू होती. मात्र, या दारुमुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले होते. ही बाब वारंवार सरपंच मनीषा खेडकर यांना खटकत होती. याबाबत पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही पोलिसांकडून तात्पुरती कारवाई होत होती. त्यानंतर पुन्हा दारुविक्री जोमात सुरू होत होती. अखेर आपल्या गावातील महिला सहकार्यांच्या संसारात डोळ्यासमोर भांडणतंटे सुरू झाल्याने या महिला सरपंचाने दुर्गेचा अवतार धारण करुन तंटामुक्ती अध्यक्ष अर्जून शेळके, पोलीस पाटील संतोष जाधव यांच्या उपस्थिती अवैध दारुविक्री करणाऱ्याला चांगलाच चोप दिला आहे. अन्याय होत असेल सहन करायचा नाही, हेच विचार घेऊन माझ्या गावातील संसारात सुरू झालेले तंटे डोकेदुखी बनली होती. त्यामुळे मला हातात दंडुका घ्यावी लागली. पुढील काळात पुन्हा असे अवैध व्यवसाय सुरु झाले तर यापेक्षाही मोठी कारवाई करणार असल्याचे सरपंच मनीषा खेडकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details