पिंपरी-चिंचवड(पुणे) - शहरातील हिंजवडी आयटी हब असणाऱ्या परिसरात कामगाराच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत. या हत्येचे कारण आणि आरोपी अस्पष्ट आहेत. आदम भीमन्ना (वय-25) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
हॉटेलच्या समोरच सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-बंगलोर मार्गालगत हॉटेल टीप-टॉप इंटरनॅशनलच्यासमोर आदम भीमन्ना या कामगाराचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा तपास सुरू केला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कामगाराच्या डोक्यात दगड घालून खून - hinjvadi labor murder
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-बंगलोर मार्गालगत हॉटेल टीप-टॉप इंटरनॅशनलच्यासमोर आदम भीमन्ना या कामगाराचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा तपास सुरू केला आहे.
पिंपरी-चिंचवड