महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Crime : बँकेत पैसे भरायला निघालेल्या युवकाला कोयता गँगने लुटले; पोलिसांना खुले आव्हान - Koyta Gang Robbed Bag of money

पुण्यात आज टू व्हीलरवरून आलेल्या दोघांनी कोयता दाखवून एका सिगारेट डिलरकडून तब्बल 45 लाखांची पैशांची पिशवी हिसकावून पळ काढला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. दुपारी घडलेल्या या घटनेने पोलिसांसमोर पुन्हा आव्हान उभे राहिले आहे.

Koyta Gant Robbery In Pune
कोयता गॅंग लुटमार

By

Published : Mar 23, 2023, 5:25 PM IST

पुणे: पिशवीत 45 लाखाची रोकड असल्याचे प्राथमिक माहिती आहे. पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरू आहे. शहरातील रस्ता पेठ परिसरात पन्ना एजन्सी व्यावसायिकाकडे काम करणारा एक व्यक्ती बँकेत रोकड भरण्यासाठी दुचाकीवरून निघाला असताना दोघा चोरट्यांनी सुरुवातीला गाडीचा अपघात झाल्याचा बहाणा केला. यानंतर रोकड घेऊन निघालेल्या व्यक्तीला थांबवले आणि रोकड असलेली पिशवी घेऊन पळ काढला.

कोयता डिलरच्या मुसक्या आवळल्या: मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन इसम अवैधपणे कोयते बाळगत असल्याची माहिती मार्केटयार्ड पोलीस यांना मिळाली होती. मार्केटयार्ड आंबेडकरनगर रिक्षा स्टॅन्ड येथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेतल्याची घटना 2 फेब्रुवारी, 2023 रोजी घडली होती. त्याचेकडे 18 कोयते व एक रिक्षा जप्त करण्यात आली होती. त्या अनुशंगाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी भवरसिंग भुरसिंग भादा, वय 35 वर्षे, राहणार गणेश नगर येरवडा पुणे तर गणेशसिंग हुमनसिंग टाक, वय 32 वर्षे, राहणार बालाजीनगर येरवडा यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी सापळा रचून पकडले: याबाबत सविस्तर माहिती अशी की, 1 फेब्रुवारी रोजी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याकडील एटीसीचे पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे हद्दीत आंबेडकरनगर रिक्षा स्टॅन्ड येथे दोन इसम रिक्षा क्र. एमएच 12 आरपी 7750 हिचेमध्ये अवैध्यरित्या कोयते विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्याच्या हातुन कोणतातरी गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आहे, अशी बातमी मिळाल्याने पोलीसांकडून सापळा रचून या इसमास ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

कोयता गॅंगची माहिती द्या अन् बक्षीस मिळवा: पुण्यात कोयता गँगच्या दहशतीने नागरिकांत भीती निर्माण होत आहे. कोयता गँगची दहशत पहता पोलिसांसमोर आरोपींना पकडण्याचे आव्हान आहे. त्यावर आता पोलिसांनी शक्कल लढवली आहे. कोयता गँगचा आरोपी पकडून दिल्यास ३ हजारांचे बक्षीस पुणे पोलिसांनी जाहीर केले आहे. तसेच बंदूक जवळ बाळगणाऱ्या आरोपीला पकडल्यास 10 हजार बक्षीस मिळणार आहे. वॉन्टेड, फरार आरोपी पकडून दिल्यास त्यालाही 10 हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. मोक्का किंवा एमपीडीएतील आरोपी पकडल्यास 5 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील पूर्व आणि पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तांनी हे बक्षीस जाहीर केले आहे.

हेही वाचा:Raj Thackeray: अटकेची टांगती तलवार; राज ठाकरे यांची उच्च न्यायालयात धाव, गुरुवारी होणार सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details