महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखेर केडगाव येथील मोहन हॉस्पिटलमधील कोविड सेंटर बंद; प्रांताधिकाऱ्यांचे आदेश - पुणे कोरोना न्यूज

रुग्णांच्या सेवे मधल्या वेगवेगळ्या त्रुटी, अतिदक्षता विभागात मर्यादेपेक्षा अधिक रुग्णांची भरती, दोन बेड अंतरामधील त्रुटी, दरपत्रकामधील वेगवेगळ्या त्रुटी, ऑक्सिजन ऑडिट प्रमाणपत्र सादर न करणे, रॅपिड अ‌ँटिजेन टेस्ट केले जाणारे नोंदणी रजिस्टर नसून आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आयसीएमआर आयडी कुठेही जनरेट झालेला दिसत नाही, अशा अनेक त्रुटी काढून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय, मुंबई यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर रद्द
कोविड केअर सेंटर रद्द

By

Published : May 9, 2021, 3:48 PM IST

दौंड (पुणे) - तालुक्यातील केडगाव येथील मोहन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. यानंतर आता सदर रुग्णालयाचे डेडिकेटेड कोविड सेंटर चालवण्याची परवानगी रद्द करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दिले आहेत. या कारवाईमुळे कोवीड सेंटरमध्ये रुग्णांची लूट होण्यास आळा बसेल, अशी आशा नागरिक व्यक्त केली आहेत.

एकाच दिवशी चार रुग्णांचा मृत्यूची घटना

मोहन हॉस्पिटलमध्ये एका दिवशी चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या आवारात आक्रोश करत गोंधळ घातला होता. त्यावर नियंत्रणासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. सदर रूग्णालयात घडलेल्या घटनेनंतर तपास करण्यात आला. त्याचबरोबर एफडीएकडे देखील नातेवाईकांनी तक्रार दाखल करण्याची विनंती तहसीलदारांना केली होती. त्यानंतर प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी सदर रुग्णालयाचे डेडिकेटेड कोविड सेंटर चालवण्याची परवानगी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर सध्या रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांवर उपचार करावा, मात्र नव्याने कोविड रुग्ण दाखल करून घेऊ नये. तसेच ज्या नातेवाइकांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याची तक्रार असल्यास त्याची रक्कम परत करण्याबाबतचे आदेशही गायकवाड यांनी दिले आहेत.

अनेक त्रुटी आढळून आल्या

रुग्णांच्या सेवे मधल्या वेगवेगळ्या त्रुटी, अतिदक्षता विभागात मर्यादेपेक्षा अधिक रुग्णांची भरती, दोन बेड अंतरामधील त्रुटी, दरपत्रकामधील वेगवेगळ्या त्रुटी, ऑक्सिजन ऑडिट प्रमाणपत्र सादर न करणे, रॅपिड अ‌ँटिजेन टेस्ट केले जाणारे नोंदणी रजिस्टर नसून आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आयसीएमआर आयडी कुठेही जनरेट झालेला दिसत नाही, अशा अनेक त्रुटी काढून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय, मुंबई यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details