महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोथरुडमध्ये मनसे उमेदवारांमागे सर्व विरोधकांची ताकद ; पाटलांची कोंडी करण्याचा प्रयत्न

मनसेकडून उमेदवारी दिलेल्या किशोर शिंदे यांच्या मागे ताकद उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मनसे उमेदवाराला पाठींबा दिला आहे, तर दुसरीकडे पाटील यांच्या उमेदवारीने नाराज झालेल्या ब्राम्हण महासंघानेही कोथरुडमधून उमेदवार दिला आहे.

कोथरुडमध्ये मनसे उमेदवारांमागे सर्व विरोधकांची ताकद

By

Published : Oct 4, 2019, 5:43 PM IST

पुणे- शहरात सध्या फक्त कोथरुड विधानसभा मतदारसंघाचीच चर्चा आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून 'कोल्हापूरचे हे पार्सल कोल्हापूरला परत पाठवा,' अशी भावना जोर धरत आहे. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून याठीकाणी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाटील हे बाहेरचे उमेदवार आहेत. यावर मतदारसंघात चर्चा सुरू आहेत. त्यातच विरोधकांनीही पाटील यांच्या विरोधात एकच उमेदवार देण्यासाठी मोट बांधल्याचे दिसून येत आहे.

कोथरुडमध्ये मनसे उमेदवारांमागे सर्व विरोधकांची ताकद

हेही वाचा-राणे समर्थक सतीश सावंत कणकवलीतून अपक्ष लढणार; नितेश राणेंना फोडणार घाम?

पाटील यांच्या विरोधात माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, अभिनेते प्रवीण तरडे यांच्याकडे चाचपणी करण्यात आली होती. काहीही करुन चंद्रकांत पाटील यांची कोथरुडमध्ये कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे मनसेकडून उमेदवारी दिलेल्या किशोर शिंदे यांच्या मागे ताकद उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मनसे उमेदवाराला पाठींबा दिला आहे, तर दुसरीकडे पाटील यांच्या उमेदवारीने नाराज झालेल्या ब्राम्हण महासंघानेही कोथरुडमधून उमेदवार दिला आहे. ब्राह्मण महासंघाच्यावतीने मयुरेश अरगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर मनसेच्या किशोर शिंदे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे येथील निवडणूक रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details