पुणे- कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला विजयस्तंभावर साजरा होणार शौर्य दिन, विधी व परंपरा जपत 50 जणांच्या उपस्थित साजरा होणार आहे. राज्यातील अनेक अनुयायी आता विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत आहेत. मात्र, सध्या आपल्या देशावर कोरोनाचे मोठे संकट असल्याने 1 जानेवारीला आंबेडकर अनुयायांनी घरातूनच अभिवादन करण्याचे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
1 जानेवारी 2021 रोजी साजरा होणाऱ्या शौर्यदिनाचा कार्यक्रम मर्यादित अनुयायांच्या उपस्थित साजरा होणार असल्याने विदर्भ, मराठवाड्यातून अनुयायी कोरेगाव-भीमा येथे येऊन सुरक्षित अंतर राखत, मास्कचा वापर करत मानवंदना देऊन परतीचा प्रवास करत आहेत.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभावर शौर्यदिनाचा कार्यक्रम होत असताना या परिसरात गर्दी होऊन नये आणि विजयस्तंभावर येणाऱ्या अनुयायांकडून कोरोनाच्या नियमांची पायमल्ली होऊ नये, यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे.