देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय दिसत नाही पुणे-koregaon Bhima 206th Shaurya Din :दोन दिवसांपूर्वी पुण्यात आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चाच्या आयोजित सभेत शिवसेनेचे नेता ( ठाकरे गट) संजय राऊतयांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नक्कल करत त्यांच्यावर टीका केली होती. यावर अजित पवार यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, असल्या सोम्या गोम्याच्या बोलण्यावर मी उत्तर देत नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला भेट देऊन अभिवादन केलं. यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी अजित पवार म्हणाले की, कोरेगाव भीमा येथे येणाऱ्या सर्व अनुयायांनी शांततेत दर्शन घ्यावे. शांततेत शौर्यस्तंभास अभिवादन करावे. हा कार्यक्रम सुरळीत पार पडावा, यासाठी प्रशासनानं संपूर्ण तयारी केली आहे, असेदेखील यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
"राज्यातून उद्योग उद्योग बाहेर गेलेले नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर काही मुद्दे नाहीत. त्यामुळंच असे मुद्दे काढण्यात येतात. कालच (रविवारी) मी मुख्यमंत्र्यांचं निवेदन ऐकलं. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की, राज्यातून एकही उद्योग बाहेर गेलेला नाही."- उपमुख्यमंत्री अजित पवार
कायदा व सुव्यवस्था टिकविण्याकरिता सहकार्य करावं- पुढे अजित पवार म्हणाले, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते व विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी विजयस्तंभाला अभिवादन केलं. दरवर्षी येथे जनसागर जमतो. येथे येणाऱ्या जनतेला अभिवादन करण्यासाठी शासनानं चांगली व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी बाकीच्या सहकाऱ्यांनी चांगली साथ दिली आहे. राज्य सरकारच्या सर्वच विभागांनी घरचे कार्य समजून योगदान दिलं. नवीन वर्ष सर्वांना सुख व समृद्धीचे जावो, या सर्वांना शुभेच्छा आहेत.
नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही- नवीन वर्षाची चांगली सुरुवात व्हावी. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था चांगली राहावी. कोणीही नागरिक लाभापासून वंचित राहू नये. विरोधाला विरोध म्हणून राजकारण करू नये. चूक असेल तर दुरुस्ती करण्यात यावी. मात्र, बदनामी व अफवा पसरविण्याचं काम सुरू आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल पाहता एक्झिट पोल चुकीचे ठरले आहेत. डॉ. बाबासाहेब यांनी मताचा अधिकार दिला आहे. देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय दिसत नाही. जगात भारताचा नावलौकिक वाढत असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
हेही वाचा-
- अजित पवारांची निधी वाटपात मनमानी, भाजपा, शिवसेना सदस्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- भाजपानं राम मंदिराचं मंगल कार्यालय करुन ठेवलंय; संजय राऊतांचा घणाघात