महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kopardi Rape Case: कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीची कारागृहात आत्महत्या; आरोपी मानसिक रुग्ण असल्याची प्रशासनाची माहिती

Kopardi Rape Case : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यातील एका आरोपीने पुण्यातील येरवडा कारागृहात आत्महत्या केली आहे. जितेंद्र शिंदे असे त्या आरोपीचे नाव आहे.

Kopardi Rape Case
कोपर्डी बलात्कार प्रकरण

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 11:59 AM IST

Updated : Sep 10, 2023, 1:42 PM IST

पुणे : Kopardi Rape Case : राज्यसह देशात गाजलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीने आज (10 सप्टेंबर) पुण्यातील येरवडा कारागृहात (Yerwada Jail Pune) आत्महत्या केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणात जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde Suicide) हा मुख्य आरोपी होता. जितेंद्र शिंदेने कारागृहात आपले जीवन संपवले आहे.

कारागृहात केली आत्महत्या : अहमदनगर येथील कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मोठे मोर्चे निघाले होते. बलात्कार प्रकरणी जितेंद्र शिंदे हा मुख्य आरोपी होता. तो पुण्यातील कारागृहात आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होता. पहाटेच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.

आत्महत्या प्रकरणाची चौकशी होणार : पुणे : कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीने येरवडा कारागृहात आत्महत्या केली आहे. याबाबत आता येरवडा कारागृह प्रशासनाने माहिती दिली. आरोपी शिंदे मानसिक रुग्ण होता आणि त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार देखील सुरू होते. तसेच या प्रकरणाची न्यायदंडाधिकारीय चौकशी होणार असल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले.

काय आहे कोपर्डी प्रकरण : अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी येथे 13 जुलै 2016 च्या संध्याकाळी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आंदोलन पेटले होते. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी मराठा समाजाने राज्यभर आंदोलन केले होते. या आंदोलनाला सर्वस्तरातून पाठिंबा मिळाला होता. तर दोषी तिघांना फाशी दिली तरच आमच्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबाने केली होती. अखेर त्या तीनही आरोपींना अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

फाशीची शिक्षा सुनावली होती : कोपर्डी येथील सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने येरवडा कारागृहात आत्महत्या केली. तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आरोपी जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष मवाळ या तिघांनी 13 जुलै 2016 रोजी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे शालेय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणी नोव्हेंबर 2017 मध्ये तिन्ही आरोपींना दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा दिली होती.

हेही वाचा -

  1. ३ वर्षे उलटली, कोपर्डीतील निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी कधी? आईचा सरकारला प्रश्न
  2. कोपर्डी प्रकरण: घटनेला ३ वर्ष पूर्ण, पीडितेचे कुटुंबीय अद्यापही न्यायाच्या प्रतिक्षेत
  3. कोपर्डी प्रकरणाची नियमित सुनावणी; मराठा क्रांती मोर्चा आरोपींना फाशी होईपर्यंत करणार पाठपुरावा
Last Updated : Sep 10, 2023, 1:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details